आशिया चषक २०१८ : जाणून घ्या… सामन्याच्या तारखा आणि वेळेविषयी

आशिया चषकाचे वेळापत्रक  :

15 सप्टेंबर – बांग्लादेश वि. श्रीलंका (ग्रुप B)
16 सप्टेंबर – पाकिस्तान वि. हाँगकाँग (ग्रुप A)
17 सप्टेंबर – श्रीलंका वि. अफगाणिस्तान (ग्रुप B)
18 सप्टेंबर – भारत वि. हाँगकाँग (ग्रुप A)
19 सप्टेंबर – भारत वि. पाकिस्तान (ग्रुप A)
20 सप्टेंबर – बांग्लादेश वि. अफगाणिस्तान (ग्रुप B)

नवी दिल्ली – आशिया चषक 15 सप्टेंबरपासून (शनिवारी) सुरू होत आहे. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सांयकाळी पाच वाजता सुरू होणार आहे. आशिया चषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होणार आहेत.

आशिया चषक 2018 स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि श्रीलंका याच्यांत होणार आहे. तर स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँगकाँग विरूध्द खेळणार आहे.

ग्रुपमधील लढतीनंतर सर्वोतम चार संघ पुढील फेरीत पात्र होणार आहेत. त्याचे नाव ‘सुपर फोर’ असे ठेवण्यात आले आहे. या फेरीतून सर्वोत्तम दोन संघामध्ये अंतिम लढत होणार आहे. सुपर फोर मधील लढती या 21 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत.त्यानंतर फेरीतील सर्वोत्तम दोन संघामध्ये अंतिम लढत ही 28 सप्टेंबर रोजी 5 वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)