आशिया चषक २०१८ : हाँगकाँगचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय

दुबई – आशिया खंडातील महत्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषकाला काल बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरूवात झाली आहे. आज ग्रुप  A मधील पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ आमनेसामने असणार आहेत.

तत्पूर्वी हाँगकाॅंग संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. काही वेळातच सामना सुरू होणार असून बलाढ्य पाकिस्तान संघाला नवखा हाँगकाँग संघ कसा सामोरा जाईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दरम्यान आशिया चषक स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेचा 137 धावांनी पराभव केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)