आशिया चषक 2018 : पाकिस्तानचा संघ जाहिर, ‘या’ प्रमुख खेळाडूला वगळले

पाकिस्तान क्रिकेट नियमाक मंडळाने 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ जाहिर केला आहे. अनुभवी फलदांज मोहम्मद हाफीज याला पाकिस्तान संघ निवड समितीने संघातून वगळले आहे.

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीने हाफीज याच्याबरोबर इमाद वसीम या खेळाडूला सुध्दा 16 सदस्यीय संघातून बाहेर ठेवले आहे. दोन्हीही खेळाडूंचा ट्रेनिंग कॅम्प दरम्यान 18 सदस्यीय दलात समावेश होता.हाफीज याच्या एेवजी शान मसूद याला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलदांज शाहीन आफिद्री आणि इमाम उल हक यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघाशी पाकिस्तान संघाचा सामना 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. पाकिस्तानचा संघ पुढीलप्रमाणे – सरफराज अहमद (कर्णधार), फखर जमां, शोएब मलिक, मोहम्मद आमिर, शादाब खान, इमाम उल हक, शान मसूद, बाबर आजम, आसिफ अली, हेरिस सोहैल, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, हसन अली, जुनैद खान, उस्मान शिनवारी, शाहीन अाफिद्री.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)