आशिया चषक २०१८ : जाणून घ्या.. स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघाबदल

नवी दिल्ली – इंग्लंड कसोटी मालिकेत झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचे आता पुढील लक्ष्य आशिया चषक आहे. आशिया खंडातील महत्वाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषकाला उद्यापासून (शनिवार) सुरुवात होणार असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या प्रमुख संघांमध्येच खरी स्पर्धा रंगणार आहे. या चार संघांव्यतिरिक्‍त या स्पर्धेत अफगाणिस्तान व हॉंगकॉंग या संघांचा समावेश करण्यात आला आहे.

आशिया चषकाची सुरूवात ही 1984 मध्ये झाली होती. सर्वात आधी ही स्पर्धा यूएई मध्ये खेळली गेली होती. आतापर्यंत 13 वेळा आशिया चषक स्पर्धा झाली असून यावर भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे.

ही चौदावी आशिया चषक स्पर्धा असून आतापर्यंत भारताने सहा वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010 आणि 2016) आशिया चषकावर नाव कोरले आहे. तर श्रीलंकेने पाच वेळा (1986, 1997, 2004, 2008 आणि 2014) आणि पाकिस्तानने दोन वेळा (2000 आणि 2012) आशिया चषक पटकावला आहे.

भारताने 1986 साली आशिया चषकात सहभाग घेतला नव्हता. त्यावेळी आशिया चषक श्रीलंका संघाने जिंकला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)