नवी दिल्ली – आशिया कप शनिवारी (15 सप्टेंबर) सुरू होत आहे. आशिया चषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे संघ सहभागी होणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ गुरूवारी दुबईत दाखल झाला आहे..

महेंद्र सिंह धोनी, कुलदीप यादव यांच्यासह सर्व खेळाडू दुबईत दाखल झाले आहेत. यावेळेस आशिया चषक हा एकदिवसीय प्रकारात खेळला जाणार आहे. 2016 साली अशिया चषक हा टी-20 प्रकारात खेळला गेला होता आणि भारताने त्यावेळी आशिया चषक जिंकला होता.

आॅल राउंडर केदार जाधव याने दुबईला रवाना होण्यापूर्वी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून रोहित, धोनी, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला केदार आशिया चषकाव्दारे पुन्हा एकदा संघात पर्दापण करित आहे.

रोहित शर्मा हा त्याची पत्नी रितिका हिच्यासोबत दुबईला आल्याचे समजत आहे. चहल आणि कुलदीप यांनी सुध्दा धोनी सोबतचा आपला फोटो शेअर केला आहे.

भारताचा स्पर्धेत पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी हाँगकाँग आणि 19 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी दुसरा सामना खेळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)