भारत वि. पाक सामन्यापूर्वींच सुरू झाला माइंड गेम

नवी दिल्ली – भारत वि इंग्लंड कसोटी मालिका संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांची नजर आशिया कपवर आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान आशिया कप  खेळला जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 19 सप्टेंबरला सामना होणार आहे. पण याआधीच खेळाडूंकडून माइंड गेम खेळण्यास सुरूवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद याचे म्हणणं आहे की, ‘आशिया कपमध्ये भारताविरूध्दातील दुसरा सामना स्पर्धेतील पुढील मार्ग स्पष्ट करेल. पाकिस्तान अाशिया कपमध्ये पहिला सामना 16 सप्टेंबरला हाँगकाँग विरूध्द तर दुसरा सामना 19 सप्टेंबर रोजी भारतविरूध्द खेळणार आहे’.

सर्फराज अहमदने म्हटले आहे की, ‘आमचा सराव चांगला चालला आहे. आम्हाला युएई मध्ये सामन्याआधी जे चार दिवस मिळणार आहेत त्याचा फायदा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. भारताविरूध्द या स्पर्धेतला आमचा मोठा आणि महत्वपूर्ण सामना असणार आहे.या सामन्यात विजय मिळवून आम्ही आमची कामगिरी कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहोत.आम्ही भारताविरूध्द खेळण्यासाठी पूर्णपणे तयारीने उतरणार आहोत’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)