अश्‍वामी मांजरेकरही करणार बॉलीवूडमध्ये पर्दापण

बॉलीवूडमधील “भाईजान’ अर्थात सलमान खान याने अनेक नविन चेह-यांना संधी दिली आहे. तसेच त्याने अनेक स्टार किड्‌सनाही लॉन्च केले आहे. एकीकडे मोहनीश बहलची मुलगी प्रनूत्न बहलला लॉन्च करण्याच्या तयारीत असताना तो आता डायरेक्‍टर आणि अभिनेता महेश मांजरेकरची मुलगी सत्या मांजरेकरलाही बॉलीवूडमध्ये लॉन्च करणार आहे.
महेश मांजरेकर आणि सलमान खान यांनी अनेक चित्रपटात एकत्रित काम केले आहे. यात रेडी, जय हो, बॉडीगार्ड, दबंग आणि दबंग-2 यासारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे.

सलमान याने काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकरची मुलगी सत्या हिला बॉलीवूडमध्ये पर्दापण करून देण्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता अश्‍वामीलाही संधी देणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याला खुद्‌द महेश मांजरेकर यांनी पुष्टि देत म्हटले की, हो, सलमान माझया मुलीला लॉन्च करणार आहेत. मात्र, अजून त्याला काही कालावधी लागणार आहे. तिला चांगली ऑफर येताच ती बॉलीवूडमध्ये प्रवेश करेल. दरम्यान, महेश मांजरेकरच्या एका मराठी चित्रपटात सलमान काम करणार होता. मात्र, हा चित्रपट काहिसा लांबणीवर पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)