राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी ‘अशोक गहलोत’ यांची वर्णी लागण्याची शक्यता

नवी दिल्ली – राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार हे आता स्पष्ट झाले आहे. एका वृत्तसंस्थेच्या सूत्राच्या माहितीनुसार राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. यासंबंधीची घोषणा दुपारी चारच्या सुमारास जयपूरमध्ये होणार आहे.

दरम्यान सचिन पायलट आणि अशोक गहलोत या दोघांची नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर होती. काँग्रेसच्या आमदाराच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्षप्रमुखावर सोपाविण्यात आला होता. गुरूवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी अनेक बैठका घेण्यात आल्या. यादरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी अशोक गहलोत यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या यासंबंधीची अधिकृत स्पष्टता झालेली नाही. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अशोक गहलोत हे जयपूरकडे रवाना झाले आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)