अश्मिता चाहिला ठरली ‘दुबई इंटरनॅशनल चॅलेंज’ किताबाची मानकरी

दुबई – भारताची बॅडमिंटनपटू अश्मिता चाहिला हिने चांगल्या कामगिरीसोबत दुबई इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला आहे. भारतीय 19 वर्षीय खेळाडू हिने महिलांच्या एकेरी अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या की जेओन जुईचा पराभव केला.
अश्मिताने केवळ 33 मिनिटांत की जेअोन जुई हिचा सरळ सेटमध्ये 21-19, 21-15 असा पराभव करत दुबई इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेचा किताब आपल्या नावावर केला.

पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूच्या मध्ये कडवी झुंज पहायला मिळाली. मात्र अश्मिताने हा सेट 21-19 ने जिंकला. त्यानंतर पुढच्या सेटमध्ये कोरियन खेळाडूवर 21-15 ने मात करत अश्मिताने हा किताब आपल्या नावे केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)