टाटा अोपन बॅडमिंटन स्पर्धा : अस्मिता चाहिलाने पटकावले विजेतेपद

File Photo

मुंबई – टाटा अोपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद अस्मिता चाहिलाने पटकावले आहे. स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीतील सामन्यात अस्मिता चाहिला हिने व्रुशाली धुम्माडीचा पराभव केला. अस्मिताने सरळ सेटमध्ये व्रुशालीचा 21-16, 21-13 असा पराभव केला. अस्मिता चाहिला हिचे या वर्षातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विजेतेपद ठरले आहे.

महिला एकेरीमध्ये उपांत्यफेरीत अस्मिता चाहिलाने थायलंडच्या छाननछिदा जुछारोएन हिचा 21-19, 21-19 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. तर उपविजेती व्रुशाली धुम्माडी हिने मुग्धा आग्रे हिचा 21-11, 21-12 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)