आसिया बिबींच्या वकिलाने जीव वाचवण्यासाठी देश सोडला 

इस्लामाबाद – पाकिस्तानमधल्या ईशनिंदा खटल्यात आसिया बिबी यांची बाजू मांडणारे वकील सैफ मुलुक यांनी जीवाच्या भीतीने देश सोडला आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकार आणि आसिया बिबी यांच्या निर्दोष मुक्ततेचा विरोध करणारे आंदोलक यांच्यात समझोता झाला आहे. यानुसार आंदोलक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकणार आहेत, तर आसिया बिबी यांना तुर्तास पाकिस्तान सोडण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. आसिया बिबींवरील हे निर्बंध किती दिवस असतील, हे स्पष्ट झालेले नाही.

प्रेषित मोहम्मद यांची निंदा केल्याच्या आरोपावरून आसिया बिबी यांना 2010ला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानातील सुप्रीम कोर्टाने बुधवारी त्यांची निर्दोष मुक्तता केली. या निर्णयाविरुद्ध पाकिस्तानातील कट्टरपंथीय रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांविरोधात बळाचा किंवा त्यांच्याशी चर्चा करणे हे दोनच पर्याय सरकारसमोर होते. बळाचा वापर केला असता तर लोक मारले गेले असते. कोणत्याही सरकारला हे नको असते. आसिया बिबींना देश सोडायला बंदी घालण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचं पालन होईल तसेच त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असे पाकिस्तानचे माहिती खात्याचे मंत्री फवाद चौधरी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)