#AirStrike – भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर ओवेसींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाकडून आज पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करत जवळपास ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. यामध्ये अझर मसूदचा मोठा भाऊ अझहर खान देखील ठार झाला आहे.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया व्यक्त करत भारतीय हवाईदलाचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी म्हटल आहे की, पुलवामा हल्ल्यानंतर 2-3 दिवसांमध्ये अशी कारवाई होईल अशी अपेक्षा होतीच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे बोलताना ओवेसी म्हणाले की, “आम्ही या कारवाईचं स्वागत करतो. आम्ही भारत सरकारसोबत आहोत. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही कारवाई दहशतवाद्यांविरूद्धची असल्याच म्हटलं आहे. सरकारने अशी कारवाई फार पूर्वीच करायला पाहिजे होती. सरकारने आता मसूद अझहर आणि हाफीज सईद यांना पकडण्यासाठी कारवाई केली पाहिजे.”

https://twitter.com/ANI/status/1100312636741378049

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)