आर्यन्स क्रिकेट क्‍लबची अंतिम फेरीत धडक

स्टार्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018

पुणे – दिग्वीजय जाधव आणि रंजीत चौगुलेच्या भेदक गोलंदाजी नंतर निनाद चौगुले आणि रोहित हडकेच्या सुरेख फलंदाजीच्या बळावर आर्यन्स क्रिकेत क्‍लबने पूना क्रिकेट क्‍लबचा आठ गडी आणि 25.3 षटके राखून पराभव करताना येथे सुरु असलेल्या स्ट्रस ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम फेरीत धडक मारली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेके गमावून प्रथम फलंदाजी करताना पूना क्‍लबने 41.2 षटकांत सर्वबाद 170 धावांची मजल मारत आर्यन्ससमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना आर्यन्सने हे आव्हान केवळ 19.3 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावा करत पूर्ण करत सामना एकतर्फी आपल्या नावे केला.

प्रत्युत्तरात फलंदाजी करणाऱ्या आर्यन्सची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर दिग्विजय जाधव एकही धाव न करता परतल्याने संघाला सुरुवातीलाच मोठा झटका बसला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या निनाद चौगुले आणि रोहित हडकेयांनी संघाचा डाव सावरताना षटकामागे 9 धावांची धावगती कायम राखत धावा करायला सुरुवात केली. त्यामुळे आर्यन्सच्या संघाला लवकर विकेत गमावल्या नंतर कोणतेही दडपण जाणवले नाही.

या दोघांनीही संघाला शंभरी ओलांडुन दिल्या नंतर रोहित हडके 45 धावांवर बाद झाला. रोहित बद झाल्यानंतरही निनादने आपल्या धावांचा वेग कायम राखत सुहेल श्रीखंडेच्या साथीतसंघाच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला. यावेळी निनादने 62 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 103 धावांची खेळी केली. तर, सुहेलने 14 चेंडूत नाबाद 19 धावा करत त्याला सुरेख साथ दिली.

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पूना क्‍लबची सुरुवात खराब झाली. त्यांचा सलामीवीर राघवेंद्र ओझा एकही धाव न करता माघारी परतला. तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा ओमकार मोहोळदेखिला केवळ 2 धावा करुन परतल्याने सुरुवातीलाच त्यांना दोन झतके बसले. त्यानंतर दुसरा सलामीवीर सुर्यकांत सरोज आणि दर्शित लुंकडयांनी सावध फलंदाजी करताना संघाचा दाव सावरायला सुरुवात केली.

मात्र, 35 धावांवर असताना सुर्यकांत बाद झाला. तर, दुसऱ्या बाजुने खेळणाऱ्या दर्शितने 81 चेंडूत 72 धावांची बहुमोल खेळी केली. दोघेही बाद झाल्यानंतर इतर फलंदाज केवळ हजेरीवीर ठरले. तर, अखेरच्या षतकांमध्ये चंद्रकांत सरोज (15) आणि दिब्यांशू कुमार नाबाद 12 यांनी थोदाफार प्रतिकार करत पूना क्‍लबला 170 धावांची मजल मारून दिली. यावेळी आर्यन्स क्‍लबच्या दिग्विजय जाधवने 16 धावांत 3 गडी बाद केले. तर, रंजीत चौगुलेने 45 धावांत 3 गडी बाद करत त्याला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक – पूना क्‍लब 41.2 षटकांत सर्वबाद 170 (दर्शित लुंकड 72, सुर्यकांत सरोज 35, चंद्रकांत सरोज 15, दिग्विजय जाधव 16-3, रंजीत चौगुले 45-3) पराभुत विरुद्ध आर्यन्स क्रिकेट क्‍लब 19.3 षटकांत 2 बाद 171 (निनाद चौगुले नाबाद 103, रोहित हडके 45, सुहेल श्रीखंडे 19, चंद्रकांत सरोज 17-1, ओंकार साळुंखे 22-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)