किंग ऑफ बॉलिवुड शाहरुख खानने काही दिवसांपूर्वी “द लॉयन किंग’ चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला होता. या चित्रपटात सिंबाच्या भूमिकेला आर्यनचा आवाज देण्यात आलेला आहे. परंतु, आर्यनमुळे एका सीनसाठी शाहरुखला पुन्हा एकदा आवाजाचे रिकॉर्डिंग करावे लागले.
याबाबत शाहरुख म्हणाला, जेव्हा आम्ही चित्रपटगृहात बसून रिकॉर्डिंग ऐकत होतो, तेव्हा डबिंगचे एक्पर्टर्स यांना माझा आवाज आणि आर्यनचा आवाज एकसारखा वाटला. त्यामुळे त्यांनी पुन्हा एका सीनसाठी मला डबिंग करण्यास सांगितले. माझा आणि आर्यनचा आवाज एकसारख असेल असे मला कधीही वाटले नव्हते. पण ते एकूण मला खूप आनंद झाला.
दरम्यान, टिझरमध्ये बाप-मुलाचा (शाहरुख-आर्यन) आवाज ऐकून चाहते अचंबित झाले होते. हा टिझर ऐकणाऱ्यांना आर्यनची आवाज शाहरुख खानच्या आवाजाशी खुपच मिलती-जुळती वाटते. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुफासाला (फादर लॉयन) किंग खानने आवाज दिला आहे. तर सिंबाचा आवाज आर्यनचा आहे. शाहरुखची पत्नी आणि आर्यनची आई गौरी खानलाही हा टिझर खुपच आवडला आहे.