यूपीएससीच्या अध्यक्षपदी अरविंद सक्‍सेना यांची नियुक्ती

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी अरविंद सक्‍सेना यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली. सक्‍सेना ऑगस्ट 2020 पर्यंत यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील.

त्यांची मे 2015 मध्ये यूपीएससीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. ते चालू वर्षीच्या जूनपासून यूपीएससीच्या प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी 1988 मध्ये कॅबिनेट सचिवालयात कार्य करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांबरोबरच विविध देशांमध्ये कार्य केले. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या निवडीसाठीच्या परीक्षा यूपीएससीकडून घेतल्या जातात.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)