बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने निवडणूक प्रक्रियेवर व्यक्त केली नाराजी…. मतदार यादीतून नाव गायब 

नवी दिल्ली –  तेलंगणामध्ये आज विधानसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. लोक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जात आहेत. मात्र लोकांचे मतदार यादीमध्ये नावच नसल्याचा प्रकार समोर येत आहे.

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाला देखील मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही.  तिने या विषयीची नाराजी ट्विटवर व्यक्त केली.  तिने ट्विट करत निवडणूक प्रकियेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

-Ads-

बॅटमिंटनपटू ज्वाला गुट्टाने ट्विट करत लिहले की, ‘आॅनलाईन पध्दतीने मतदार यादीत माझे नाव शोधल्यानंतर  मतदार यादीत माझे नाव नाही, हे पाहून मी आश्चर्यचकित आहे….जर नावच मतदार यादीतून गायब असेल तर ..निवडणूक कशी काय योग्य असू शकते’.

ज्वाला गुट्टाचे हे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेअर करत लिहिले की, ‘हे तर संपूर्ण देशात होत आहे’.

आज तेलंगनामध्ये 119 जागांसाठी तर राजस्थानमध्ये 199 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. व याचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)