भाजप हरला तरी कॉंग्रेस जिंकलेली नाही – केजरीवाल

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेससहित अन्य पक्षांचे चारित्र्य एकच असल्याचे सांगून दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या पक्षांवर टीका केली आहे. तीन राज्यांतील निवडणुकीत कॉंग्रेसचा विजय झालेला नाही, तर भाजपचा पराभव झाला आहे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले.

आप पक्षाच्या राष्ट्रीय परिषद बैठकीत भाषण करताना केजरीवाल यांनी हे मत व्यक्‍त केले. या सर्व पक्षांचे चरित्र एकसारखेच आहे. त्यामुळे या पक्षांच्या राजकारणामुळे निराश झालेल्या जनतेला प्रत्येक निवडणुकीत केवळ सत्ताधारी पक्षाला हरविण्यासाठी मतदान करावे लागते. म्हणून तीन राज्यांमध्ये जनतेने भाजपला पराभूत केले आहे, खऱ्या अर्थाने हा कॉंग्रेसचा विजय नाही, असे ते म्हणाले.

गेल्या 70 वर्षांमध्ये देश निराश झाला होता कारण प्रत्येक पाच वर्षांनी सरकार बदलणे हा जनतेचा निरुपाय झाला होता. आम्ही जनतेच्या अपेक्षांवर उतरलो आहोत. त्यामुळेच विरोधी लाटेची कल्पना आता प्रस्थापित-अनुकूलमध्ये बदलली आहे, असे ते म्हणाले.

कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे सांगून ते म्हणाले, की आमच्या विरोधात जेव्हा पोलिसांचा छापा पडतो तेव्हा सर्वांत आधी कॉंग्रेस खुशी व्यक्‍त करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)