नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले पियूष गोयल यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पियुष गोयल यांनी छोट्या शेतकऱ्यांपासून मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. याबदल केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी अर्थमंत्री पियूष गोयल यांचे कौतुक केले आहे. या बजेटमुळे मध्यम वर्गीय लोकांची स्वप्ने साकार होतील असे म्हटले आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेला गेले असल्यामुळे केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार पियूष गोयल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. जेटली यांच्या गैरहजेरीत गोयल यांनी शुक्रवारी 2019-20 चा अंतरिम बजेट मांडले.
त्यानंतर जेटली यांनी ट्टिट करत म्हटलं आहे की, हे बजेट प्रगतीच्या दिशेने देशाला घेऊन जाणारे आहे. गरीबांना शक्ती देणारा, मध्यमवर्गाची स्वप्ने साकार करणारा आणि श्रमिकांना सन्मान देणारा तसेच सर्वाना अनुकूल असा हा अर्थसंकल्प आहे.
त्यांनी म्हटले, वर्ष 2014 ते 2019 दरम्यानचे सारे बजेट मध्यम वर्गांना दिलासा देणारे ठरले आहेत. जेटलीने म्हटले हे बजेट वित्तीय तूट नियंत्रणात आणणारे बजेट आहेत.
Between 2014-19, every Budget has given significant relief to the Middle Class.
— Arun Jaitley (@arunjaitley) February 1, 2019
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा