कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उत्पादकता वाढेल -अनंत महेश्‍वरी

मायक्रोसॉफ्टची विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना

नवी दिल्ली – एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भारतीय बिझनेस आणि इतर गोष्टींना प्रगतीसाठी मदत मिळेल. विशेषतः शिक्षण, कौशल्य, आरोग्यसेवा आणि कृषी या क्षेत्रांची यामुळे उत्पादकता वाढेल, असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत महेश्‍वरी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले की, प्रत्येक संघटना आणि व्यक्‍तीचे सबलीकरण करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रे आणि शिक्षण क्षेत्रातील भागधारकांसोबत काम करून मनुष्यकेंद्रित एआयसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

एआयची ताकद आता जाणवू लागली आहे आणि ती भारताचे रूप पालटवू शकते. मायक्रोसॉफ्ट आपल्या क्‍लाऊड आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर देशासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना आणणे आणि डिजिटल क्रांतीला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. 700 पेक्षा अधिक व्यवसाय आणि सरकारी संस्थांनी आपल्या डिजिटल क्रांतीमध्ये महत्त्वाचे टप्पे आणण्यासाठी एआय सोल्यूशन्स अंगीकारले आहेत.

715 भागीदार मायक्रोसॉफ्टसोबत भारतात कार्यरत आहेत. ते ग्राहकांना एक सर्वांगीण एआय धोरणाचे डिझाइन आणि अंमलबजावणीसाठी मदत करत आहेत. मायक्रोसॉफ्ट सरकार, उद्योग, शैक्षणिक आणि नागरी समाजातील भागधारकांसोबत काम करून एआयबाबत सर्वांगीण दृष्टिकोन आणत आहे आणि नागरिकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या उपाययोजना आखत आहे.

मायक्रोसॉफ्टचा विश्‍वास आहे की टॅलेंटचा विकास हा आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचा आहे. सर्व विभागांमध्ये नागरिकांचे सबलीकरण करून एआय यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एआय तंत्रज्ञान लागू करण्यासाठी सक्षम बनवण्याचे कार्य मायक्रोसॉफ्टकडून केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)