यंदाच्या कुंभमेळ्यावर ‘आर्टिफिशियल इंटीलीजेंसची’ नजर 

file photo

लखनौ : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज शहरामध्ये १५ जानेवारी ते ४ मार्च या कालावधीमध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यासाठी यावर्षी सरकारकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विशेष उपायोजना आखण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या कुंभमेळ्यावर सरकार आर्टिफिशियल इंटीलीजेंसद्वारे (यांत्रिक बुद्धिमत्ता) नजर ठेवणार आहे. यासाठी सरकारकडून कुंभमेळ्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ३२०० हेक्टर क्षेत्रावर १००० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

याबाबत माहिती देताना उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी म्हणाले की, “कमांड आणि कंट्रोल सेंटरमध्ये आर्टिफिशियल इंटीलिजन्स वापरण्यात येणार असून यामुळे पोलिसांना सीसीटीव्हीद्वारे मिळालेल्या चित्रफितींचे शास्त्रीय आकलन करता येणार आहे. गर्दीची दिशा, संख्या याबाबत अचूक माहिती मिळू शकणार आहे तसेच काही संशयित हालचाली जाणवल्या तर त्या देखील आर्टिफिशियल इंटीलिजन्सद्वारे टिपल्या जातील.”


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)