#व्यक्तिमत्व : रेडीमेड गणेशोत्सव ( भाग १)

-सागर ननावरे

गेल्या वर्षीचा गणेशोत्सवाचा प्रसंग. गणपती विक्रीच्या दुकानांत तुडूंब गर्दी झाली होती. वेगवेगळ्या रूपांतील आकर्षक गणपती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. मंडळाच्या गणपतीच्या मंडपासमोर मोठ्या आवाजात भक्तिगीतांचा गजर सुरू होता. लहान मुले डोक्‍याला ‘गणपती बाप्पा मोरया’ नावाच्या भगव्या पट्ट्या बांधून मधूनच मंगलमूर्ती मोरया….. चा जयघोष करीत होती. एकूणच सारे वातावरण कसे प्रसन्न आणि मंगलमय वाटत होते.

आमच्या शेजारचा छोटा ओंकार नवे छान छान कपडे परिधान करून मोठ्या उत्साहाने त्याचा मित्र आकाशकडे गेला होता. आकाशच्या घरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती. आकाश तर गणपती बाप्पाला आणायला जाण्यासाठी सर्वांत आधीच आवरून बसला होता. काही वेळातच सारा बालचमू तिथे जमा झाला. जो तो आपापल्या गणपती बाप्पाच्या आगमनाबाबत भरभरून बोलत होता.

तेवढ्यात आकाशने ओंकारला प्रश विचारला,” अरे ओंकार तू सांगितले नाहीस की तुमचा गणपती कधी आणि कसा आणणार ते ?
त्यावर ओंकार बोलला,” अरे माझे बाबा सतत कामात खूप बिझी असतात. माझ्या बाबांना सुट्टी नसते. त्यामुळे माझे बाबा ऑफिसमधून येतानाच गणपती बाप्पा घेऊन येणार आहेत.”

आकाश बोलला,” अरे व्वा ! मग तुझी आई आणि तू गणपती आणण्यासाठी बाबांकडे जाणार आहात का?
त्यावर थोड्या निराशेने ओंकार उत्तरला,” नाही रे, बाबांचे काम कधी संपेल माहीत नाही. त्यामुळे ते स्वतःच येताना कारमधून गणपती घेऊन येणार आहेत.”

त्यावर त्यातला एक खोडकर मुलगा लगेच बोलला, “अरे ओंकार, तुझे बाबा गणपती बाप्पा काय गाडीच्या डिकीत ठेवून आणणार आहेत का ? आणि गणपती बाप्पा मोरया च्या घोषणा काय टेपवर लावणार काय ?
त्या खोडकर मुलाच्या त्या वाक्‍याने ओंकार क्षणातच हिरमुसला आणि आईकडे जाऊन रडू लागला. परंतु त्या खोडकर मुलाच्या त्या वाक्‍याने ओंकारची आईही निरुत्तर झाली होती.

मित्रांनो, वरील प्रसंग सांगण्यामागचा उद्देश थोडा वेगळा आहे. सध्या प्रत्येकजण बिझी झाला आहे. पैशाच्या मागे धावत सुटला आहे. परंतु या बिझी शेड्युलमुळे आपला आनंद आणि आरोग्य आपण गमावत चाललो आहोत. आणि याहूनही सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की या बिझी शेड्युलच्या नावाखाली आपल्याला आपल्या संस्कृतीचाही विसर पडत चालला आहे. पूर्वीचा गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव यात मोठा फरक पडू लागला आहे.

पूर्वी गणपती बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी घरातील सर्वजण आनंदाने एकत्र जायचे. येताना गणपती बाप्पा मोरया चा जयघोष सारे कुटुंबीय मोठ्या जल्लोषात करायचे. आता मात्र बंदिस्त गाडीतून अगदी गुपचूप गणपती घरी आणला जातो. त्यामुळे या आगमनाच्या जल्लोषाला आपण गमावत चाललो आहोत.

#व्यक्तिमत्व : रेडीमेड गणेशोत्सव ( भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)