#विशेष लेख : अमेरिकेचा ‘याॅर्कर’, इम्रानची कोंडी (भाग २)

-अभय कुलकर्णी

#विशेष लेख : अमेरिकेचा ‘याॅर्कर’, इम्रानची कोंडी (भाग १)

गेल्या काही दिवसांत ट्रम्प प्रशासन आणि पाकिस्तानचे इम्रान सरकार यांच्यात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून शाब्दिक वाद उद्‌भवत आहेत. आता अखेरीस ट्रम्प सरकारने पाकिस्तानला दिली जाणारी 2100 कोटींची मदत रोखण्याचा निर्णय घेऊन अनपेक्षित यॉर्कर टाकला आहे. प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानची आणि पर्यायाने नवपंतप्रधान इम्रान खान यांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे.

अमेरिकेने यावर्षीच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला 50 कोटी डॉलरची आर्थिक मदत थांबवली होती. ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ट्‌विट करून पाकिस्तानला खोटे बोलण्याचा आणि दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या आरोप करत कारवाईचा बडगा उगारला होता. आता अमेरिकेने नवीन पाऊल टाकल्याने पाकिस्तानचे नवनिर्वाचित इम्रान खान यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाकिस्तान सध्या आर्थिक कोंडीत सापडलेला असताना इम्रान खान यांनी गेल्याच महिन्यात देशाची धुरा खांद्यावर घेतली आहे.

पाकिस्तानच्या गंगाजळीत सातत्याने घट होत चालली आहे. मे 2017 मध्ये पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा 16.4 अब्ज डॉलर होता, तो आता 10 अब्ज डॉलरवर पोचला आहे. तसे पाहिले तर सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांची भूमिका ही एकंदरीतच मुस्लीम राष्ट्रांच्या आणि खास करून पाकिस्तानच्या दृष्टीने कडक राहिलेली आहे.

अर्थात, त्यांच्या दुटप्पी स्वभावामुळे आणि सततच्या कोलांटउड्यांमुळे ते पाकबाबत ठोस भूमिका घेतील का याबाबत साशंकता होती. कारण अनेकदा ते पाकिस्तानसमवेत मित्रत्त्वाचे नाते प्रस्थापित करताना दिसले आहेत. यावरुन त्यांना भारतासह अनेक देशांच्या टीकेलाही सामोरे जावे लागले आहे. मात्र शेवटी अमेरिकेला 15 वर्षाच्या चालढकलीनंतर का होईना पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घ्यावा लागला.

गेल्या पंधरा वर्षात अमेरिकेकडून पाकिस्तानला दोन लाख 8 हजार 461 कोटींची मदत घेतली आहे. फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानने निर्मितीपासूनच अमेरिकेकडून मदत घेतली आहे. मात्र 2001 मध्ये अमेरिकेवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला मदतीचा ओघ काही प्रमाणात कमी झाला. 1951 पासून 2011 पर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी अमेरिकेने पाकिस्तानला 67 अब्ज अमेरिकी डॉलरची मदत केली आहे.

मोदी सरकार आल्यानंतर भारत सातत्याने अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघासारख्या व्यासपीठावरून दहशतवादाविरोधात लढण्याऐवजी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना दिला जाणाऱ्या आश्रयाची माहिती जगासमोर मांडत आहे. यामुळे पाकिस्तानचा दुसरा आणि खरा चेहरा जगाला पाहावयास मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)