जम्मू-काश्‍मीरला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कलम 370 रद्द करावे

मुंबई – जम्मू-काश्‍मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कलम 370 रद्द करावे, अशी मागणी आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. काश्‍मिरी नागरिक आपण वेगळे असल्याचा विचार करून भारतपासून दूर जाऊ नयेत. यासोबतच जम्मू-काश्‍मीरमधील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून जम्मू-काश्‍मीरसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी त्यांनी आपल्या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

पुलवामामध्ये भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आमदार लोढा यांनी नमुद केले की, काश्‍मीरमधील कलम 370 रद्द करून तिथे व्यावसायिक आणि औद्योगिक विकासासाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी. जेणेकरून तेथील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल. कलम 370 रद्द करणे ही काळाची गरज आहे. याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

आपण आजवर देशाच्या हितासाठी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे देश अधिक बळकट आणि सक्षम झाला आहे. आपल्या निर्णयामुळे जम्मू-काश्‍मीरमधील तरुणांना रोजगारासोबतच विकासाची एक नवीन दिशा मिळेल. तसेच काश्‍मीरमधील 370 कलम रद्द केल्याने कोट्यवधी भारतीयांची वर्षानुवर्षापासून असलेली मागणीला न्याय मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)