शृंगेरी पीठाचे विधुशेखर भारती यांचे शंकराचार्य पीठामध्ये आगमन

कोल्हापूर, (प्रतिनिधी): शृंगेरी पीठाचे विधुशेखर भारती स्वामी यांचे श्रीमद जगदगुरू शंकराचार्य पीठामध्ये उद्या (ता. 30) आगमन होणार असून ते कोल्हापुरात दोन दिवस राहणार असल्याची माहिती सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. शृंगेरी जगदगुरू अनंतश्री विभूषित विधुशेखर स्वामी यांचे दर्शन आणि धर्म संबोधनाच्या हेतूने येथील करवीर पीठात येणार आहेत.

शुक्रवारी (ता. 30) दुपारी साधारण एक वाजता बेळगाव येथून विधुशेखर स्वामी कोल्हापूरकडे प्रयाण करतील. त्यांनतर 3.30 वाजता कोगनोळी टोलनाका येथे मंत्रपुष्पांजलीने स्वागत केले जाईल. दुपारी चार वाजता कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ येथे त्यांचे आगमन होईल व सायंकाळी 5 वाजता करवीर पीठ येथे जगदगुरू शंकराचार्य पप श्री विद्यानृसिंह भारती स्वामी स्वागत करतील. सायंकाळी सात वाजता ते धर्म संबोधन करतील.

दरम्यान, यासंबंधात सर्व हिंदुत्ववादी संघटना सहकार्य करीत आहेत. पीठामध्ये त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असून भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्म संबोधनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही भेंडे यांनी केले.

फोटो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)