पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन

सातारा – संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज दुपारी 2 च्या सुमारास टाळ- मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ- मृदुंगाचा गजर आणि हरिभजनात तल्लीन होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्तीरसात चिंब होऊन गेला.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्ह्याच्यावतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन थाडे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे, उपजिल्हाधिकारी महसूल अविनाश शिंदे, तहसिलदार विवेक जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदींसह विविध पदाधिकारी, मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी पूष्प अर्पण करुन स्वागत केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नीरा नदीतील स्नानानंतर संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मान्यवरांनी तसेच लाखो भाविकांनी दर्शन घेतले. माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. हरिनामाच्या गजरात आणि टाळ- मृदुंगाच्या निनादात पालखी सोहळ्यात भाविक तल्लीन झाले होते. यावेळी आरोग्य विभागाने तयार केलेल्या आरोग्य रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध विभागांच्या सामाजिक संदेश देणारे फलक विशेष लक्ष वेधून घेत होते.

000000


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)