दागिन्यांची परस्पर विल्हेवाट लावणारे दोघे गजाआड

नगर – दागिन्यांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्याला बारा तासांत गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सौरभ नितीन माजगावे व अमर पंडित आकृड, असे आरोपीचे नाव आहे. कृष्णा संभाजी संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे.
कृष्णा संकपाळ यांनी सौरभ नितीन माजगावे याला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून दागिने घेण्यास पाठविले होते.

सौरभ याने 17 हजारांचे दागिने व 20 हजारांची रोख रक्कम असे एकूण 37 हजारांचा मुद्देमाल गोळा केला होता. हा मुद्देमाल संकपाळ यांच्याकडे जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावत पसार झाला होता. संकपाळ यांनी नगर तालुका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास केला.

-Ads-

सौरभ नितीन माजगावे (वय 20) याला कोल्हापूर येथे जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. सौरभ याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने मुद्देमाल साथीदार अमर पंडित आकृड (रा. पिंपळगांव, जि. कोल्हापूर) याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी या गुन्ह्याची उकल बारा तासात केली. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा गुन्ह्याच्या तपास आणि उकलीचे स्वागत केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)