ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी अटकेत

जयपूर (राजस्थान): राजस्थान पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला नवी दिल्लीत अटक केली आहे. ही टोळी ग्राहकांना ऑनलाईन खरेदीवर “गिफ्ट”चे आमीष दाखवून लुबाडण्याचे काम करत होती. या कामासाठी टोळीने मासिक पगारावर 14 कर्मचारीही नेमले होते. या प्रत्येकाला दररोज 30-40 कॉल करण्याचे लक्ष्य ठरवून देण्यात आलेले होते. ग्राहक मिळाल्यानंतर कर्मचाऱ्याला 1 ते 2 टक्के कमिशनही देण्यात येत होते.

रविवारी नवी दिल्लीत एका कॉल सेंटर छापा मारून बिकानेर पोलीसांनी 20 जणांना अटक केली. त्यापैकी 14 जण पगारी नोकर होते. या टोळीचा प्रमुख वीर सिंह, सहदेव, सुधीर, देवेंद्र, वेदप्रकाश आणि अरुण कुमार यांना पाच दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. गेले दोन महिने कॉल सेंटरचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. कॉल करून कस्टमरला जाळ्यात पकडल्यानंतर कॉल सीनियर्सकडे फॉर्वर्ड करण्यात येत असे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)