भाजपकडून प्रशांत किशोर यांच्या अटकेची मागणी

पाटणा विद्यापिठाच्या निवडणूकीदरम्यान आचार संहितेचा भंग केल्याचा आरोप

नवी दिल्ली: संयुक्‍त जनता दलाचे उपाध्यक्ष आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना ताबडतोब अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच संयुक्‍त जनता दलामध्ये प्रवेश केला असून सध्या ते मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय समजले जात आहेत.

-Ads-

प्रशांत किशोर यांनी पाटणा विद्यापिठातील विद्यार्थी संघटनेच्या उद्या (5 डिसेंबर रोजी) होणाऱ्या निवडणूकीमध्ये वादग्रस्त भूमिका पार पाडल्याच्या आरोपावरून भाजप त्यांच्यावर नाराज आहे. प्रशांत किशोर यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या 4 आमदारांनी आज पीरबारहोर पोलिस ठाण्याच्या आवारात धरणे आंदोलन केले.

प्रशांत किशोर हे भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला लक्ष्य करत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवडणूकांवर प्रभाव टाकण्यासाठी पाटणा विद्यापिठाचे कुलगुरु आर.बी.सिंह यांची सोमवारी भेट घेतली होती, असा आरोपही या आमदारांनी केला. कुलगुरुंच्या निवासस्थानातून बाहेर पडताच प्रशांत किशोर यांच्या कारवर विद्यार्थी नेत्यांकडून हल्ला झाला. मात्र प्रशांत किशोर यांनी आचार संहितेचे उल्लंघन केलेले नाही, असे स्पष्टिकरण कुलगुरु आणि पोलिस अधिक्षकांनी दिले आहे.

तरिही प्रशांत किशोर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपच्या नेत्यांनी विद्यापिठाचे कुलपती आणि बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांची भेटही घेतली. बिहारमध्ये सत्तारुढ संयुक्‍त जनता दलाबरोबर आघाडीमध्ये असलेल्या भाजपकडून प्रशांत किशोर यांच्या अटकेची मागणी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.
रस


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)