दुष्काळी भागात पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था करा : अर्जुन खोतकर

मुंबई: राज्यातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती उद्‌भवली आहे. अशा भागात गाई, बैल यासारख्या पशूधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राज्य शासनामार्फत करावी. याअंतर्गतच मेंढी व शेळीसाठी देखील पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था व्हावी, असे पशू, दुग्ध आणि मत्स्य विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. राज्यातील मेंढपाळ करणाऱ्या धनगर समाजातील प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात राज्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

खोतकर यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची चौकशी करत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. धनगर समाजातील मेंढपाळ हा घटक रानावनात भटकंती करुन उदरनिर्वाह करतो. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला होणे, दरोडे पडणे यासारख्या बाबी घडून येतात. या दरोड्यांची चौकशी व्हावी यासाठीचे निवेदन यावेळी देण्यात आले. मेढ्यांवरील रोगाचे निदान करण्यासाठी पुणे येथे प्रयोगशाळा सुरु करावी, तसेच मेंढ्यावरील औषधांच्या किंमती जास्त असल्याने उपचाराचा खर्च वाढतो त्यापेक्षा जेनेरिक औषधी उपलब्ध करून द्यावी या देखील मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या सर्व मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊन समाधान काढण्यात येईल, असे आश्‍वासन खोतकर यांनल दिले. या शिष्टमंडळात लहू शेवाळे, अजित खरात, नामदेव बाजोडे, शिवलाल बोंद्रे आणि वर्षाताई खताळ यांचा समावेश होता.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)