#अौषध_बगीचा : जुई

-सुजाता गानू

जुईची नाजूक वेल आणि त्या वेलीवर फुलणारी पांढरी नाजूक धुंद करणारी फुले साऱ्यांनाच आकर्षीत करतात. जुईच्या फुलापानांचे महत्त्व खूप आहे. जईची वेल गुणकारी आहे. म्हणून पूर्वीच्या काळी दारात जुईची वेल नेहमी फुललेला असे.

हृदयविकारावर – जुईच्या सुगंधी फुलांचा अर्क हृदयासाठी गुणकारी आहे.

-Ads-

दाताच्या रोगांवर – कोणत्याही दंतरोगांवर जुईच्या पानांचा खूप अपयोग होतो. दात दूखत असल्यास कचाकचा जुईची पाने दाताने चावून मग थुंकावीत. अथवा पानांच्या रसाने दात घासावेत व हिरड्यांच्या बळकटीसाठी पानांचा रस तोंडात घोळवत ठेवावा. अशाप्रकारे दंतरोगावर जुईची पाने उपयुक्‍त आहे.

पित्तनाशक – जुईच्या सुगंधी फुलांचा अर्क दोन थेंब जर रोज गाईच्या दूधातून पोटात घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.

मुरडा झाला असल्यास – पोटात मुरडा झाला असल्यास जुईच्या फुलांचा अर्क गाईच्या दूधातून पोटात घ्यावा.

रक्‍तदोषावर – जुईच्या पानांचा व फुलांचा रस रक्‍तदोष दूर करतो.

जुनाट व्रणावर – जुईचा पाला वाटून लावल्याने जुनाट व्रण बरे होतात. जुईचा पाला वाटून जेवढी व्रणाची किंवा जखमेची जागा असेल तेवढ्यावर पाल्याचे पोटीस बसवावे. जखम लगेच बरी होते.

नाकातील माळीण बरी करण्यासाठी – जुईची सुगंधी फुले हुंगल्याने उष्णतेने नाकात फोड झाला असल्यास तो लगेच बरा होतो.

आळस जाण्यासाठी उत्साहवर्धक – जुईच्या फुलांचा गजरा करून तो जवळ बाळगल्यास अथवा स्त्रियांनी तो केसात माळल्यास उत्साह वाटतो. जीवन जगण्याची तरतरी येते व आळस जातो. फुलांपासून बनवलेले अत्तर किंवा परफ्युमचे दोन थेंब रोज स्नान करताना घ्यावयाच्या पाण्यात टाकले असता शरीर शुद्ध व उत्साही तसेच आनंदी बनते. सकारात्मक ऊर्जा शरीरात खेळू लागते.

त्वचारोगावर – जुईच्या पानांचा लेप लावला असता त्वचा विकार बरे होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी – जुईची पाने किंचित मधात चुरडून चेहऱ्यावरील पिंपल्सना लावली असता चेहरा नितळ व्हायला मदत होते.

अशाप्रकारे जुईची पाने व सुगंधी फुलांचा अर्क खूपच गुणकारी आहे.म्हणूनच श्रीलक्ष्मीला जुईची फुले प्रिय आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)