जैसलमेर – भारतीय आर्मीने 2019 सालच्या डेझर्ट स्टॉर्ममध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शनिवारी पार पडलेल्या या स्पर्धेतील सांघिक प्रकारातील तीनपैकी दोन गटात त्यांनी जेतेपद मिळवत चमक दाखवली. टीम आर्मी ऍडव्हेंचर विंग्स लेफ्टनंद कर्नल अमन कटोच आणि सहचालक कॅप्टन सिद्धार्थ नांदल यांनी अपेक्षेनुसार चांगली कामगिरी करत एनड्युर गटात दुसरे स्थान मिळवत उप-विजेतेपद मिळवले.
पारितोषिक वितरण समारंभास त्यांनी आपल्या पोषाखासह उपस्थिती लावली होती. त्यांचे सर्वात अनुभवी चालक लेफ्टनंट कर्नल शक्ती बजाज व त्यांचा सह चालक आदित्य चांद याणी एक्स्ट्रीम गटात दहावे स्थान मिळवले. आर्मीच्या महिला गटात सहभाग नोंदवणा-या स्पर्धकांमध्ये मेजर युथिका आणि नेव्हिगेटर तेजल पराशरे (एक्स्ट्रीम गट), मनिषा गैंद आणि मेजर के.रेणुका (मोट) या सर्वांनी लक्ष वेधले.
आर्मीच्या संघातील स्पर्धक नवी दिल्ली येथे 7 मे ला पार पडलेल्या स्पर्धेच्या सुरुवातीस देखील आर्मीच्या वेशभुषेत उपस्थित होते. त्यांचे एक्स्ट्रीम गटात 10 दहा संघ व मोटो गटात तीन संघ सहभागी झाले होते. डेझर्ट स्टॉर्म स्पर्धेतील हा सर्वात मोठा संघ होता.आम्ही येथे आमची ड्युटी बजावण्यासाठी आलो होतो. आर्मी ऍडव्हेंचर विंग स्पर्धेत चांगली कामगिरी करत चमक दाखवली. असे मेजर युथिका म्हणाल्या.
मी गेल्या 11 महिन्यांपासून रॅलीत सहभागी झाले. माझ्या बाळाचा जन्म झाल्यानंतर एक वर्षानंतर मी सुरुवात केली. मी आर्मी ऑफिसर असल्याने शारिरिक्ष क्षमतांचा कस लागणा-या गोष्टी करण्यास मला आवडते व त्यामधून सर्वोत्तम देण्याचा माझा प्रयत्न असतो. कधीकधी ते आव्हानात्मक देखील असते. पण, मला याचा अभिमान आहे. मी इकडून ट्रॉफी घेऊन जात नसली तरीही आठवणी व अनुभव मी कधी विसरणार नाही असे त्यांनी सांगितले.
लेफ्टनंट कर्नल शक्ती बजाज हे गेल्या दशकभर रॅलीत सहभाग नोंदवत आहेत व एक सैनिक म्हणून बजाज हे उत्तम उदाहरण आहेत. एनड्युअरन्समध्ये सहभाग नोंदवल्याचा अभिमान आर्मीला असल्याचे बजाज यांना वाटते. आर्मी सर्व्हिस कॉर्प्सच्या मेजर के.रेणुका यांनी काराकोरम पास या 18,176 फुट उंचावर असल्याने ठिकाणापर्यंत पोहोचणा-या पहिल्या महिला बाईकर होण्याचा मान मिळवला.
सेनेसाठी अशा स्पर्धांमध्ये आपण सहभाग नोंदवत असून या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे.असे रेणुका म्हणाल्या. महिला म्हणून आम्हाला संदेश द्यायचा आहे की काहीही असंभव नाही.प्रत्येक महिलेने पुढे येऊन अशा पद्धतीच्या रॅलीमध्ये सहभाग नोंदवा. सेनेत असल्याने आम्ही हर मानत नाही. खेळाच्या मैदानात देखील आम्ही याच मानसिकतेने उतरतो असे रेणुका म्हणाल्या.