स्वतःचे अपयश लपविण्यासाठी सैन्य, वैज्ञानिकांचा वापर – मनसे

मुंबई – सरकार स्वतःच अपयश सैन्याच्या, वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ट्विट करून केली आहे. मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारलं, मग कर्नाटकने, त्यानंतर ५ राज्यातील जनतेने नाकारलं. मोदींच्या आता कोणत्याच क्लुप्त्या काम करणार नाहीत… असे म्हणत मनसेने मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदींनी आज पहिली सभा मेरठ येथे घेतली. मोदींच्या या सभेला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मात्र ही गर्दी केवळ पहिल्या काही रांगेत होती मात्र मागे खुर्च्या रिकाम्याच असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे मोदी-शहांना पहिल्यांदा गुजरातने नाकारलं, मग कर्नाटकने, त्यानंतर ५ राज्यातील जनतेने नाकारलं आणि आता देश पण नाकारेल असे मनसेने म्हंटले आहे.

भारतीय वैज्ञांनिकानी काल अंतरिक्ष क्षेत्रात मोठी कामगिरी केली. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनी अँटीसॅटेलाईट मिसाईल (A-SAT) यशस्वीपणे लाँच केले. अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला असल्याची माहिती नरेंद्र मोदींनी काल माध्यमांव्दारे दिली. मात्र त्यानंतर नरेंद्र मोदी शास्त्रज्ञांचे श्रेय लुटत असल्याची टीका राजकीय वर्तुळातून सुरू झाली होती. आज मनसेने देखील यावर भाष्य करत काल वैज्ञानिकांनी यश मिळवलं पण मोदींनी त्यात स्वत:ची प्रतिमा कशी उजळून निघेल याची पुरेपूर काळजी घेतली असल्याचे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)