रांची – झारखंडच्या सिरनीया धरणानजीक 134 वी बटालियन आणि जिल्हा पोलिसांना नक्षलवाद्यांच्या विरोधात यश मिळाले आहे. शोधमोहिमेदरम्यान सीआरपीएफ आणि पोलिसांच्या पथकाने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, कॅनबॉम्ब अणि स्फोटकांसह अन्य सामग्री हस्तगत केली आहे.
राज्य सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यापासून मोठी मोहीम उघडलेली आहे. निवडणुकीच्या काळातही चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे हिंसाचार रोखण्यास राज्यसरकारला यश मिळाले असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.