#MeToo : श्रीलंकेचा माजी कर्णधार ‘अर्जुन रणातुंगा’वर गैरवर्तणुकीचा आरोप

नवी दिल्ली – बाॅलीवूड पासून सुरू झालेले #MeToo अभियान आता क्रिकेटमध्येसुध्दा पोहचले आहे. साल 1996  मध्ये श्रीलंका संघाला विश्वचषक जिंकून देणारा माजी क्रिकेटपटू व कर्णधार आणि सध्या श्रीलंका सरकारमध्ये मंत्री असलेले ‘अर्जुन रणातुंगा’ यांच्यावर  #MeToo अंतर्गत गैरवर्तणुकीचे आरोप झाले आहेत.

एका भारतीय एअर होस्टेसने अापल्या फेसबुक अकाउंटवर रणातुंगासोबत घडलेली घटनेचा सविस्तर उल्लेख केला आहे. या एअर होस्टेसने लिहिले आहे की, ‘मुंबईतील एका हाॅटेलमधील स्विमिंग पूलजवळ अर्जुन रणातुंगा याने तिच्यासोबत गैरवर्तन केले होते’.

-Ads-

संंबंधित एअर होस्टेस मुलीने ही घटना श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर आली त्या दरम्यान घडल्याचे लिहिले आहे. पण हे स्पष्ट नाही आहे की, ‘ही घटना नेमकी कोणत्या वर्षी घडली’. ही घटना त्यावेळी लगेचच हाॅटेलच्या रिसेप्शिनस्टला सांगितली असता रिसेप्शिनस्टने म्हटले की, ‘याबाबतीत मी कोणतीही मदत करू शकत नाही, हा तुझा खाजगी विषय आहे’, असेही संबंधित मुलीने म्हटले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)