अर्जुन तेंडुलकर झालाय रेडिओ विक्रेता

लाॅर्डस स्टेडियम बाहेर आतापर्यंत विकले ५० रेडिअो

लंडन – महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या युवा क्रिकेटर्ससाठी आयोजित प्रशिक्षणासाठी इंग्लंडमध्ये आहे. दरम्यान तो भारतीय संघाच्या सरावदरम्यान मैदानावरही दिसून आला होता. मध्यतंरी तो इंग्लिश महिला संघाच्या सदस्यासोबत लंच करताना दिसला होता.  मात्र यावेळेस सध्या एका कारणाने चांगलाच चर्चेत आला आहे.

-Ads-

ते म्हणजे अर्जुन सध्या लाॅर्ड स्टेडियमच्या बाहेर डिजीटल रेडिओ विकताना दिसत आहे.याबाबतची माहिती भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग याने दिली आहे. याबाबतचे त्यांनी एक ट्विट फोटोसकट पोस्ट केले आहे. त्यामध्ये हरभजन याने म्हटले आहे की, बघा छोटा सचिन म्हणजेच अर्जुन हा लाॅर्ड मैदाना बाहेर रेडिअो विकत आहे. ५० रेडिअो विकले गेले आहेत. घाई करा कारण काहीच रेडिओ शिल्लक आहेत.

या हरभजनच्या ट्विटला चांगलीच पंसती मिळत आहे. आणि अनेकांना अर्जुनचा हा अंदाज चांगलाच आवडलेला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)