‘या’ इंग्लंडच्या महिला क्रिकेटरसोबत अर्जुन तेंडुलकरचा फोटो व्हायरल

नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या चार दिवसीय कसोटी मालिका संपवून इंग्लंडमध्ये सुट्यांचा आनंद घेत आहे. यादरम्यान त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

या फोटोमध्ये अर्जुन तेंडुलकर इंग्लंड महिला संघाची क्रिकेटर डेनियल व्याट दिसत आहे. दोघेही एकत्र डिनर करताना दिसत आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तर काही जणांनी फोटोला ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान, याआधीही डेनियल व्याट विराट कोहलीमुळे चर्चेत आली होती. २०१४ मध्ये टी-२० मध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने दमदार खेळी करत अर्धशतक बनविले होते. यावेळी डेनियल व्याटने ट्विटरवरून विराट कोहलीला विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्जुन तेंडुलकरने श्रीलंकेविरुद्ध चार दिवसीय कसोटी मालिकेतील भारताच्या अंडर- १९ संघात खेळून आपल्या आंतरराष्ट्रीय करियरला सुरुवात केली आहे. परंतु या मालिकेत अर्जुनला आपल्या खेळाची फारशी चुणूक दाखवता आली नाही. या सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकर केवळ तीन विकेट आणि १४ धावाच बनवू शकला. तर दुसरीकडे डेनियल व्याटही किया वुमन क्रिकेट सुपर लीग स्पर्धेत सदर्न वाईपर्सकडून खेळत असून तिलाही विशेष खेळी करता आलेली नाही. या सामन्यामध्ये डेनियल व्याटने ६ डावात ९४ धावा केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)