बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल सध्या मॉडल गॅब्रिएला डेमेट्रिएड्ससोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अर्जुनने काही दिवसांपूर्वीच आपल्या गर्लफ्रेंडच्या प्रेग्नेंसीची माहिती सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपल्या गर्लफ्रेंडचा एक सुंदर असा फोटो पोस्ट केला आहे.
अर्जुनने आपल्या इंस्टाग्रावर आपली गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटो गॅब्रिएला खूपच क्युट दिसत आहे. या फोटोचे वर्णनही अर्जुनने तितकीच मोहक अशा शब्दांत केले आहे. अजुॅनने हार्टच्या इमोजीसह “एंजेलिक (Angelic)’ असे लिहिले आहे. हा फोटो पाहिला असता, तो फोटोशूटमधील असल्याचे वाटते. कदाचित, तिच्या प्रेग्नेंसीचे फोटोशूट करण्यात आले असावे.
दरम्यान, गॅब्रिएलाने बेबी शावरची तयारी केली असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या तयारीत अर्जुनची पत्नी मेहरही सहभागी आहे. हा कार्यक्रम ज्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आला आहे, त्या कंपनीचा मेहरशी संबंध आहे. ती या कार्यक्रमाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजीपूर्वक चौकशी करत असते.