हाॅकी विश्वचषक स्पर्धा 2018 : अर्जेंटिनाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

भुवनेश्वर – येथील कलिंगा स्टेडियममधील मैदानावर ग्रुप ए मधील अर्जेंटिना आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळविला. अर्जेंटिनाने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करत हाॅकी विश्वचषकातील क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

अर्जेंटिनाकडून अगस्टीन मजिलीने 23 व्या मिनिटाला, लुकास विलाने 41 व्या मिनिटाला आणि लुकास मार्टिनेजने 55 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघास विजय मिळवून दिला. अर्जेंटिनाने या विजयासह 3 गुण प्राप्त केले.

अर्जेंटिनाचा संघ दोन सामन्यातील विजयामुळे 6 गुणांसह ग्रुप ए मध्ये पहिल्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा संघ दोन सामन्यात 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. याआधी अर्जेंटिनाने स्पेनला 4-3 ने हरवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)