अंतिम लढतीत बरोबरीनंतर शुटआउटमध्ये दक्षिण कोरियाने मारली बाजी

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज दहाव्या दिवशी  महिलांच्या कम्पाऊंड सांघिक गटात भारतीय महिला तिरंदाजी संघाने रौप्यपदक पटकाविल्यानंतर पुरूष संघाने देखील तिरंदाजीमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे.

आशियाई स्पर्धेच्या पुरूष कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम फेरीच्या लढतीत भारतीय संघाचे रौप्यपदक थोडक्यात हुकले आहे. अंतिम लढतीत दक्षिण कोरियाने 229-229 अशी बरोबरी साधल्यानंतर शुटआउट घेण्यात आले. शुटआउटमध्ये मात्र भारताला हार पत्करावी लागली. आजच्या भारतीय संघात रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश होता.

भारताचे या स्पर्धेतील 15 वे रौप्यपदक ठरले. साल २०१४ च्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाने याच गटात सुवर्णपदक पटकाविले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)