हात नसलेली अर्चना सोडविते 10 वीचे पेपर

सातारा – पंधरा वर्षांपुर्वी चुलीच्या निखाऱ्यात दोन्हीही हाताची दहाही बोटं जळून खाक झालेली मुलगी. दोन्ही मनगटात पेन धरुन दहावीचे बोर्डाचे पेपर लिहित असलेली अर्चना सिदु यमकर. गवळीनगर कोकिसरे. सिदू धुळा यमकर यांची कन्या सध्या मोरणा विद्यालय, मोरगिरी ता. पाटण या शाळेत इ. 10 वी च्या वर्गात शिकत असून एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत पेपर सोडवत आहे.

अर्चना नुकतीच रांगायला लागलेली होती.लहान चिमुरड्या मुलीला लहान भावंडांच्या आधारावर सोडून आईवडील मजुरी कामाकरिता शेतात गेले असताना घरात मोठं माणुस कोणीच नव्हत. त्यावेळी ती मुलगी खेळत खेळत चुली जवळ गेली आणि रखरखीत विस्तवाचे निखारे असलेल्या चुलीत दोन्ही हात गेले आणि मनगटापर्यंत दोन्हीही हाताचे तळवे व दहाही बोटे जळून खाक झाली.

वडीलांनी घरच्या बिकट परिस्थितीमुळे घरगुती उपाय सुरू केले होते. आणि आज तीच मुलगी डोंगरकपारींतून पाऊल वाटेने गवळीनगर ते मोरगिरी चालत दहावीची परीक्षा देत आहे. तिच ही दुर्दैवी मुलगी. जीने दुर्देवा बरोबर परिस्थितीवर मात करून दहावीचा पेपर दोन्ही मनगटात पेन धरून लिहिले आहे. सहा महिन्यापुर्वी अर्चनाच्या वडिलांचे निधन झाले. तरीसुद्धा न डगमगता ती जिद्दीने शिकत आहे.

एस.एस.सी.बोर्डाकडून तिला सहाय्यक रायटर घेण्याची सुविधा आहे. पण अर्चनाने ती सुविधा नाकारत स्वत:च्या हातानेच पेपर सोडवण्याचा हट्ट धरला.अस्थिव्यंग असल्याने अर्चनास 20 मिनिट जादा वेळ बोर्डाने दिला आहे. पण इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने ती पेपर सोडवत आहे. मोरणा विद्यालयातील शिक्षकांनी आजपर्यंत तिला सर्वकाही मदत केली

अर्चनाची लहान बहिण कु. सुनिता ही इ. 9 वी च्या वर्गात मोरणा विद्यालयातच शिकत आहे. सुनिता अर्चनाची सर्व कामे करते तिची कपडे वेणी जेवण व अन्य कामे सुद्धा लहान बहिण सुनिताच करत असल्याने अर्चना आज इथपर्यंत पोहचली आहे. कु. अर्चना हुशार तर आहेच पण तिचे हस्ताक्षर सुद्धा सुंदर आहे. विद्यालयातील अनेक उपक्रम व कार्यक्रमात तिचा सहभाग असतो. दोन्ही हातांनी अपंग असलेली व शिक्षणासाठी जिद्दी असलेल्या अर्चनाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)