नवी दिल्ली – भारताची अव्वल नेमबाज अपूर्वी चंडेला हिने आपली सुवर्ण कामगिरी कायम ठेवली असून जर्मनीतील म्युनिच येथे सुरू असलेल्या यंदाच्या वर्षांतील तिसऱ्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. अपूर्वीने अंतिम फेरीमध्ये एकूण 251 गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ 205.8 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनची जु होंग 229.4 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
अपूर्वी आणि वांग यांच्यादरम्यानची लढत खूप चुरशीची ठरली. त्यात भारतीय खेळाडू फक्त 0.1 गुणाने आघाडीवर होती. अपूर्वीने अखेरीस 10.4 गुणांसह सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले, तर वांग फक्त 10.3 गुणच मिळवू शकली. अपूर्वी हिचे वर्षातील हे दुसरे आयएसएसएफ विश्वचषकातील सुवर्णपदक ठरले. याआधी तिने फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे विश्व विक्रम रचताना पहिले स्थान पटकावले होते. बीजिंगमध्ये दुसजया विश्वचषकात ती चौथ्या स्थानावर होती. अपूर्वी हिचे कारकीर्दीतील हे चौथे आयएसएसएफ पदक आहे.
एक अन्य भारतीय इलावेनिल वलारिवान फायनलपर्यंत पोहोचली; परंतु ती दुर्दैवाने पदकापासून वंचित राहताना चौथ्या स्थानावर राहिली. ती कांस्यपदक जिंकणाजया खेळाडूच्या तुलनेत फक्त 0.1 गुणाने पिछाडीवर राहिली. पात्रता फेरीमध्ये अपूर्वी आणि इलावेनिल यांनी अंतिम फेरीत आगेकूच ठरली. अंतिम फेरीमध्ये अंजूम मोदगील 11 व्या, मनू भाकर 24 व्या आणि चिंकी यादव 95 व्या स्थानावर राहिली. या स्पर्धेतून रोमानियाच्या लॉरा जार्जेटा कोमान व हंगेरीच्या इस्टर मेसजारोस यांनी 2020 ऑलिम्पिक कोटा मिळवला.
लॉरा व इस्टर यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान पटकावले. याआधीच भारताकडून अपूर्वी चंदेला, सौरभ तिवारी, अभिषेक वर्मा, दिव्यांशसिंग पवार यांनी ऑलिम्पिक कोटा मिळवला. सोमवारी तीन अंतिम फेजया होतील. यात 6 ऑलिम्पिक कोटा असतील.