साडेचोवीस कोटी रुपयांचा निधी मावळसाठी मंजूर

इंद्रायणी’वरील 9 कोटी रुपयांच्या पुलासाठी मंजुरी

तळेगाव दाभाडे – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कान्हेफाटा ते टाकवे रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुलाच्या कामासाठी 9 कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यामुळे आंदर मावळ भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

यंदाच्या पुरवणी अर्थसंकल्पात मावळ मतदार संघातील खालील कामांसाठी 24 कोटी 44 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. यात एकूण 11 कामे मंजूर झाली असून त्यामध्ये प्रामुख्याने 1) कुरवंडे खंडाळा रस्ता प्रजिमा 146 किमी.0/00 ते 3/00 व 6/500 ते 15/200 ची सुधारणा करणे. रु.100.00 लक्ष, 2) सडवली शिवणे डोणे रस्ता कि.मी.0/100 मधील मोठ्या पुलाच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन करणे.100.00 लक्ष, 3) कान्हेफाटा टाकवे वडेश्वर कुसूर खांडी सावळा रस्ता प्रजिमा 22 कि.मी.10/00 ते 20/00 ची सुधारणा करणे. 400.00 लक्ष, 4) एकविरा देवी पायथा ते कार्ला भाजे लोहगड ते प्रजिमा 27, प्रजिमा 25 रस्ता कि.मी.4/500 ते 6/700 ते 8/200 ची सुधारणा करणे. रु.200.00 लक्ष, 5) मुंबई-पुणे-बैगलोर रस्त्याची वडगाव, कामशेत, वलवन अंतर्गत लांबी रा.मा.126 कि.मी.0/200 ते 1/800 ची सुधारणा करणे. 60.00 लक्ष 6) कान्हेफाटा टाकवे वडेश्वर रस्ता प्रजिमा 22 कि.मी.3/400 मध्ये पुलाची पुनर्बांधणी करणे.

900.00 लक्ष, 7 कामशेत नाणे गोवित्री जांभवली कोंडेश्वर मंदिर रस्ता प्रजिमा 78 कि.मी.18/600 ते 22/00 ची सुधारणा करणे. रु.135.00 लक्ष, 8) प्रजिमा 26 ते औढे देवले मळवली पाटण पाथरगाव ते रा.मा.4 ला मिळणारा रस्ता प्रजिमा 107 कि.मी.0/00 ते 13/200 ची सुधारणा करणे.81.00 लक्ष, 9) सांगवडे दारूंब्रे रस्ता प्रजिमा 105 कि.मी.0/00 ते 3/200, 9/00 ते 12/00 व 22/600 ते 24/00 ची सुधारणा करणे. 128.00 लक्ष, 10) सोमाटणे शिवणे कडधे रस्ता प्रजिमा 28 कि.मी.9/500 ते 10/500 व 15/600 ते 18/600 ची सुधारणा करणे.160.00 लक्ष, 11) रा.मा.55 ते इंदोरी जांभवडे जाधववाडी रस्ता करणे. प्रजिमा 103 कि.मी.9/00 ते 15/00 ची सुधारणा करणे. रु. 180.00 लक्ष असा एकूण 24 कोटी 44 लक्ष रुपये निधी खालील कामासाठी मंजूर झालेला आहे.

दरम्यान, आगामी काळात मावळ तालुक्‍याला विकासाचे मॉडेल करण्यात येणार असल्याची माहिती कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनवर्सन राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)