“मन की बात’मध्ये मोदींकडून वेदांगीचे कौतुक

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षातील अखेरच्या “मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना सायकलीवरून जगाला प्रदक्षिणा घालणाऱ्या वेदांगी कुलकर्णी हिचे कौतुक केले. तब्बल 29 हजार किमी अंतर सायकलवरून 154 दिवसांत पार करत सर्वांत कमी वेळेत जगप्रदक्षिणा पूर्ण करून वेदांगी आशियातील सर्वांत वेगवान महिला सायकलपटू ठरली आहे. तसेच, कोरियामध्ये झालेल्या कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या श्रीनगरच्या 12 वर्षाच्या हनाया निसारचेही कौतुक केले.

यावेळी मोदींनी 2018 मध्ये सरकारने विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीची माहिती दिली. वर्ष 2018 हे सर्व भारतीयांना गौरवान्वित करणारे आणि त्यांची मान उंचावणारे वर्ष ठरले आहे. वर्ष 2018 कायम स्मरणात राहील, असे मोदी यांनी म्हटले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावर्षी 15 जानेवारीपासून प्रयागराज येथे जगप्रसिद्ध कुंभमेळा आयोजित होत आहे, ज्याची कदाचित तुम्ही सगळेही उत्सुकतेने वाट बघत असाल. कुंभमेळ्यासाठी आतापासूनच संत-महात्मे प्रयागराजला पोहोचू लागले आहेत. गेल्या वर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्‌भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिले आहे. यावरून आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते.

यावर्षात जगातील सर्वांत उंच पुतळ्याचे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिट’चे लोकार्पण झाले. तसेच “चॅम्पियन्स ऑफ अर्थ’ या पुरस्कारने संयुक्त राष्ट्राने भारताचा गौरव केला. 2018मध्ये आयुषमान भारत योजना सुरू झाली. देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचली, सिक्किमला देशातील 100वे विमानतळ लाभले, देशाला पर्यावरण क्षेत्रातील “चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार मिळाला, असे सांगत मला खात्री आहे की वर्ष 2019 भारतासाठी पूर्वीपेक्षा आणखी चांगले राहील, असा विश्‍वास मोदींनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)