न्या. कॅव्हनॉग यांच्यावर डेमॉक्रेटसचे खोटे आरोप : डोनाल्ड ट्रम्प 

वॉशिंग्टन: न्यायमूर्ती ब्रेट कॅव्हनॉग यांच्यावर डेमॉक्रेटिक पक्षाच्या नेतृत्वाने लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले. त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होता येऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात खोटा प्रचार करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाईट हाऊसमध्ये न्या. ब्रेट कॅव्हनॉग यांच्या शपथग्रहण समारंभात ते बोलत होते.
डेमॉक्रेटिक पक्षाच्या खोट्या आरोपांमुळे आणि बदनाम करण्याच्या प्रयत्नामुळे न्या. कॅव्हनॉग आणि त्यांच्या कुटुंबीयांना जो त्रास झाला आणि मनस्ताप सहन करावा लागला त्यासाठी मी संपूर्ण देशाच्या वतीने त्यांची माफी मागतो. असे सांगून डोनॉल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, की राष्ट्रसेवेसाठी पुढे येणाऱ्या व्यक्तींना निष्पक्ष आणि सन्मानित जीवन जगायचे असते. खोटेपणा आणि फसवणुकीवर आधारित राजकीय आणि वैयक्तिक बदनामी करणाऱ्या प्रचाराची त्यांना अपेक्षा नसते. न्या. ब्रेट कॅव्हनॉग बाबतीत जे काही झाले, ते निष्पक्षता आणि सभ्यपणाचे उल्लंघन होते.
माझ्या नियुक्‍तीपूर्वी जे काही झाले, त्याबद्दल माझ्या मनात कोणत्याही प्रकारची कटुता नाही, मी सर्वांशी मिळून मिसळून निष्पक्षपणे काम करणार आहे असे न्यायमूर्ती ब्रेट कॅव्हनॉग यांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)