उत्तर प्रदेशमधील 20 लाख सरकारी कर्मचारी आजपासून संपावर-एस्मा लागू

लखनौ (उत्तर प्रदेश) : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्याच्या काळातच उत्तर प्रदेशातील सुमारे 20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी आज बुधवारपासून संप पुकारलेला आहे. या महासंपामध्ये सुमारे 150 संघटनांचे 20 लाखापेक्षा अधिक सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि अधिकारी सहभागी होत आहेत. पेन्शन आणि अन्य मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारला आहे. जर संपाचा परिणाम फारसा जाण्वला नाही, तर सरकार सहा दिवस संप चालवून घेईल. पण जर का संपाचा अश्‍व उधळला, तर मात्र त्यावा त्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले आहे.

त्या दृष्टीने उत्तर प्रदेश सरकारने एस्मा (एसेन्शियल सर्व्हिसेस मेटेनन्स ऍक्‍ट) अत्यावश्‍यक सेवा अनुरक्षण कायदा जारी केला आहे. एस्माच्या कलम 3 उपकलम 1 मध्ये लोकसेवा, राज्य सरकारच्या स्वामित्व वा नियंत्रणाखालील कोणत्यही निगम वा वा स्थानिक प्राधिकरणे, टपाल सेवा, रेल्वे सेवा, आणि विमानतळांसह आवश्‍यक सेवांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एस्मा चा भंग करणारास एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लखनौचे जिल्हाधिकारी कौशल राज यांच्या आदेशावरून लखनौतील सर्व पोलीसठाण्यांच्या क्षेत्रात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार कोणत्याही संवैधनिक संस्थेच्या आसपास झेंडे वा लाऊड स्पीकरने प्रचार करता येणार नाही. निदर्शने, हरताल वा धरणे धरता येणार नाही. सरकारी इमारत वा भवनांवर राजकीय झेंडे, बॅनर्स, पोस्टर्स लावता येणार नाहीत. स्वीकृत मार्गाशिवाय रॅली, धरणे, मशाल मिरवणूक आदी काढता येणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)