पुणे, बारामतीसाठी आजपासून दाखल करता येणार उमेदवारी अर्ज

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून (दि.28) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी विधानभवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही दि. 4 एप्रिलपर्यंत असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी दाखल करता येणार आहे.

पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दुसऱ्या टप्प्यात शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी गुरुवारपासून (दि.28) ते दि.4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. उमेदवारी अर्जांची छाननी दि. 5 एप्रिलला संबधित निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत ही 8 एप्रिलपर्यंत आहे. तर मतदान दि. 23 एप्रिलला होणार असून मतमोजणी दि.23 मे ला होणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहे. तर बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अतिरिक्त विभागीय आयुक्त सुभाष डुंबरे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – दि. 28 मार्च
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – दि. 4 एप्रिल
उमेदवारी अर्जांची छाननी – दि. 5 एप्रिल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – दि. 8 एप्रिल
मतदान – दि. 23 एप्रिल
मतमोजणी – दि. 23 मे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here