पुणे, बारामतीसाठी गुरुवारपासून स्वीकारणार उमेदवारी अर्ज

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा निवडणुकीसाठी येत्या गुरुवारपासून (दि.28) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी दि. 2 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.

यंदा प्रथमच पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आणि दुसऱ्या टप्प्यात शिरूर आणि मावळ मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी दि. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर शिरूर आणि मावळसाठी 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. पुणे आणि बारामतीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 5 एप्रिलला तर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी 10 एप्रिला होणार आहे. पुणे आणि बारामती मतदारसंघासाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे, तर शिरूर आणि मावळसाठी 29 एप्रिलला मतदान होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)