नवी दिल्ली – ऍपल कंपनी भारतीय बाजारपेठेतबाबत कमालीची आशावादी झाली आहे. त्यामुळे कंपनीने आयफोन 7 भारतात उत्पादन करायला सुरुवात केली आहे. कंपनीची पुरवठादार लिस्टओन नावाच्या कंपनीने बंगलोरमध्ये या फोनचे उत्पादन अगोदरच सुरू केले आहे, असे ऍपलच्या प्रवक्त्याने एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
भारतात उत्पादन केल्यामुळे कंपनीला भारतातील ग्राहकाला आपले फोन तुलनेत स्वस्तात देता येतील. गेल्या महिन्यापासूनच आयफोन 7 चे उत्पादन सुरू झाले आहे असे त्यांनी सांगितले. या कंपनीने गेल्या वर्षी कोलार जिल्ह्यातील नरसापूर औद्योगिक वसाहतीत तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे.
या कंपनीचे प्रमुख गुरू राज यांनी सांगितले की, आम्ही या ठिकाणी 43 एकर जागेवर कारखाना उभारणार आहोत. यातून दहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. आम्ही भारतातील ग्राहकांना स्वस्तात फोन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.