“ऍपल’चे बाजारमूल्य एक लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त

न्यूयॉर्क: आयफोन बनविणारी कंपनी ऍपल जगातील पहिली एक लाख कोटी डॉलर बाजार मूल्याची कंपनी बनली आहे. हा बहुमान प्राप्त करण्यासाठी ऍपल केवळ 16 अब्ज डॉलरने मागे होती. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा मान प्राप्त केला आहे.

ऍपलनंतर त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी ऍमेझॉनचा क्रमांक असून, या दोन कंपन्यांनंतर अल्फाबेटचा (गुगल) क्रमांक आहे. ऍपलचे शेअर आज 207.05 डॉलर या आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चस्तरावर पोहोचले आणि कंपनीने एक लाख कोटी डॉलरचा टप्पा पार केला.

-Ads-

ऍपलने मंगळवारीच आपल्या तिमाही परिणामांची माहिती देताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये कंपनी आयफोनपेक्षा महाग फोन बाजारपेठेत आणणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्के वाढ पाहावयास मिळाली. 1997 मध्ये ऍपल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कंपनीने सहसंस्थापक स्टिव्ह जॉब्स यांना सीईओ म्हणून परत आणले. जॉब्स यांनी आयपॉड आणि आयफोनसारखे उत्पादने आणून ऍपलला एका नव्या उंचीवर नेले.

कंपनीने आपल्या सर्व यापूर्वीच्या मॉडेल्समध्ये 20 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे कंपनीचा नफा वाढला आहे. एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीच्या आयफोनची विक्री 1 टक्‍का वाढली आहे. पण उत्पन्नात 17 टक्‍के वाढ झाली आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)