लग्नपत्रिकेत मोदींना मतदान करण्याचे आवाहन

प्रचारासाठी वेगवेगळ्या युक्‍त्या, तंत्रे राजकीय पक्ष, उमेदवार वापरत असतात. पण कित्येकदा पक्ष अथवा नेत्यांचे चाहते, समर्थक, अनुयायी, भक्‍त हेदेखील आपापल्या परीने आपल्या लाडक्‍या नेत्याचा प्रचार न सांगता करत असतात. असाच एक गमतीदार किस्सा बिहारमध्ये घडला आहे.

बिहारमधील सिवान जिल्ह्यातील हसनपुरातील सिसवा कला गावात राहणाऱ्या अशोक सिंह यांनी आपली कन्या सलोनीच्या विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेवर वधूला आशीर्वाद देण्याचे आवाहन करतानाच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच मते द्या असा आग्रह करणारे आवाहनही केले आहे. अशोक सांगतात की, मला माझ्या लेकीच्या लग्नात कोणत्याही भेट वस्तू नकोत. त्याऐवजी सर्वांकडून मला मोदींनाच मत देईन याची हमी हवी आहे. जेणेकरून देशाचा विकास होईल आणि देश प्रगती करेल !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)